वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसोबत आज संवाद साधला आहे ऑपरेशन गंगा च्या माध्यमातून भारताने यशस्वी प्रयत्न करत वेगवान तयारी केली आहे. आज वाराणसी येथे युक्रेनमधून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या विद्यार्थ्यांनी त्यांना आपले थरारक अनुभव सांगितले. हे विद्यार्थी वाराणसी तसेच उत्तर प्रदेशातील इतर भागातील होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताकडून ऑपरेशन गंगा कशा पद्धतीने राबवण्यात आले यासंदर्भात माहिती उपस्थितांना दिली यावेळी यूरिन मधून परतलेल्या भारतीयांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत परतलेल्या भारतीयांनी ऋण व्यक्त केले.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारत एअरलिफ्ट ऑपरेशन गंगा यशस्वी करण्यावर भर देत आहे आणि त्यांना मायदेशी परत आणत आहे. आतापर्यंत एकूण 17,000 भारतीय नागरिकांनी युक्रेन सोडले आहे. आणि युक्रेनमध्ये अडकलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा अंतर्गत उड्डाणे वाढवण्यात आली आहेत. या मोहिमेअंतर्गत भारताचा संपूर्ण परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी तसेच केंद्रीय मंत्रिमंडळ आतले मंत्री या मोहिमेत सहभागी झाले आहे.
24 फेब्रुवारीच्या रशियन लष्करी हल्ल्यानंतर युक्रेनचे हवाई क्षेत्र बंद असल्याने भारत आपल्या नागरिकांना युक्रेनच्या शेजारील रोमानिया, हंगेरी, स्लोव्हाकिया आणि पोलंड मार्गे विशेष विमानांद्वारे बाहेर काढत आहे. दोन भारतीय विद्यार्थ्यांचा युक्रेनमध्ये मृत्यूही झाल्याची माहिती समोर देण्यात आहे. त्यांच्या मृतदेह भारतात आणण्याचेही प्रयत्न सुरू असून युद्ध हो भूमीतून त्या विद्यार्थ्यांचे मृतदेह भारतात आणणे मोठे आव्हान असणार आहे.