मुंबई राजमुद्रा दर्पण – महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळातील मंत्री नवाब मलिकांचा राजीनामा राज्य सरकारने तात्काळ घ्यावा, म्हणून आज भाजप राज्यभरात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.नवाब मलिकांना ईडीने ताब्यात घेऊन देखील राज्य सरकार राजीनामा घेत नसल्याने आज भाजपाकडून मोर्च्याचं आयोजन करण्यात आलं होते. त्यावेळी तिथं नवाब मलिक यांच्यामागे सत्ता उभी केली, या सरकारपासून महाराष्ट्राला मुक्त करायचं आहे. बेईमान आघाडीला नेस्तनाबूत करायचं आहे. युतीच्या प्रेमापोटी नवाब मलिक यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दहशतवादामध्ये ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे, पैशाच्या नावावर जमिनीच्या माध्यमातून पैसे वाटले गेले आहे. असे आरोप देखील भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
“ज्या देशाचा देशभक्त दहशतवादाला विसरतो तो कधीच सुरक्षित राहू शकत नाही. 1993 बॉम्बस्फोटात कोणी हात गमावला, कोणी पाय गमावला. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सत्ता प्रिय असल्याची घणाघाती टीका देखील यावेळी मुनगंटीवार यांच्याकडून करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील लोक फक्त सत्तेसाठी विचार करणारी लोक आहेत. आमच्या पक्षाचं चिन्ह फ्लॉवर आहे पण आम्ही आता फ्लावर नाही फायर होणार असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना खळबळजनक टोला लगावला आहे.
मुंगटीवार यांनी आपल्या भाषणात बोलताना थेट महाविकास आघाडी वर निशाणा साधत असताना राजीनामा तुमच्या बापाला द्यावा लागेल. भाजपने तुमची दाणादाण केली आहे. या नेत्यांच्या तावडीतून महाराष्ट्राला वाचवायचं आहे, कारण सत्तेत आल्यापासून त्यांनी लोकांचं वाटोळ केलं आहे असंही मुंनगटीवार म्हणाले आहे. तसेच त्यांनी शरद पवारांचं नाव न घेता टीका देखील केली. आज मोर्चात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोप-यातून भाजपाची लोक आली होती. आता आमच्या संघर्षाला सुरूवात झाली त्यामुळे आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा नक्की घेणार असल्याचे सुध्दा त्यांनी आपल्या भाषणात टोक पणे सांगितले आहे.