जळगाव राजमुद्रा दर्पण | काल दि 13 मार्च रोजी शनीपेठ परिसरात झालेल्या दोन गटाच्या दगडफेकी मध्ये नेमके संशयित कोण ? यासाठी पोलिसांकडून पकडण्यात आलेल्या संशयितांनी दिलेल्या माहिती नुसार चाचपणी करण्यात येत आहे. यामध्ये दोन गटात झालेल्या दगडफेक प्रकरणात अद्याप पर्यत आठ ते नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्यासह पथकाने आपल्या कर्मचाऱ्यासह संपूर्ण परिसरात चौकशी करीत आहे. 25 ते 30 अज्ञातां विरोधात शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
जळगाव शहरातील शनीपेठ परिसरात रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास उसनवारीच्या पैशातून दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. याचे रूपांतर थेट हाणामारी मध्ये झाले काही वेळात वाद वाढल्याने दोन्ही गटाकडून जोरदार दगडफेक करण्यात आली होती. दगडफेकीत ३ वाहनांचे नुकसान झाले असून २ होमगार्ड देखील जखमी झाले होते. रात्री उशिरापर्यंत कुणीही तक्रारदार समोर न आल्याने सहाय्यक फौजदार नंदकिशोर पाटील यांनी स्वतः फिर्याद देत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
दोन गटात दगफेकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून फरार झालेल्या संशयितांचा शोध सुरू आहे. यामध्ये पोलिसांनी चौकशी केली असता अनेक संशयित सापडून आलेले नाही. शनिपेठ हा परिसर अति संवेदनशील असून या भागात अनेक वादाचे प्रसंग उद्भवत असतात मात्र गेल्या काही दिवसापासून टोळी युद्ध याभागात सुरू झाले. अनेकांवर गुन्हे देखील मात्र पुन्हा पुन्हा या पद्धतीच्या घटना परिसरात गळत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.