जळगाव राजमुद्रा दर्पण | जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांची पंचवार्षिक मुदत संपली असून 20 मार्च पासून जिल्हा परिषदेत प्रशासक राज्य आले आहे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांची महाराष्ट्र शासनाकडून प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने पुढील कारभार मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले डॉक्टर आशिया हेच बघणार आहे.
जिल्हाभरात पंचायत समित्या नगरपालिका अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूका पुढे ढकलल्या गेल्याने प्रशासक राजाले आहे. ओबीसी आरक्षण या मुद्द्यावर संपूर्ण निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका अद्याप जाहीर न झाल्याने आता जिल्हा परिषदेवर पदाधिकाऱ्यांची सत्ता अधिकार संपुष्टात आली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचा आर्थिक बजेट सादर होण्यापूर्वी पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून लालचंद पाटील हे कार्यभार पाहत होते, मात्र त्यांचा देखील कार्यकाळ संपुष्टात आल्याने यंदाचा बजेट हा प्रशासक सादर करणार आहेत या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील कामाला लागले आहे.
20 मार्च पासून प्रशासक जिल्हा परिषद चालवण्याची सूत्रे हाती घेतले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका जोपर्यंत होणार नाहीत तोवर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर पंकज आशिया हे प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेचा कारभार पाहतील असे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आले आहे.