नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण | सततं होणाऱ्या डिझेल पेट्रोल दरवाढी बाबत काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे उत्तर प्रदेश पंजाब उत्तराखंड गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकांत पूर्वी स्थगित करण्यात आले पेट्रोल-डिझेलची दरवाढ आता पुन्हा करण्यात आली आहे प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस ना महागाई विरोधात आंदोलन करण्याची घोषणा देखील केली आहे.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात या संदर्भात बैठक घेण्यात आली असून काँग्रेसनं महागाई मुक्त भारत अभियान जाहीर केले आहे. 31 मार्च ते 7 एप्रिल पर्यंत देशव्यापी आंदोलन सरकार विरुद्ध छेडण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनीकळवली आहे.
देशव्यापी आंदोलन संदर्भात नवी दिल्ली येथील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयांमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 31 मार्च पासून काँग्रेसकडून महागाई विरोधात देशभरात आंदोलन छेडण्यात येणार आहे. मागायच्या विरोधामध्ये काँग्रेसकडून थाली बजाव महगाई भंगाव….. असा नारा देण्यात आला आहे. देशभरात जिल्हा स्तरावर देखील आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन ते चार एप्रिल जिल्हास्तरावर आंदोलन करावे अशा सूचना देखील काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आले आहे. तरी सोडून महागाई मुक्त भारत अभियान सुरू करण्यात आले असून 31 मार्च 7 एप्रिल दरम्यान ते सुरू राहणार आहे आंदोलनाची सुरुवात काँग्रेसकडून देशातील राज्याच्या राजधानीच्या शहरांमध्ये सात एप्रिलला होणार आहे प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली हा मोठा निर्णय काँग्रेस कडून घेण्यात आला आहे.