जळगाव राजमुद्रा दर्पण | शहरात लागोपाठ दोन जणांचे निर्गुण हत्या झाल्याने संपूर्ण जळगाव शहर हादरले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. समता नगर भागात खुनाची घटना उघडकीस आली त्याच प्रमाणे शिवाजी नगरातील एका तरुणावर अनैतिक संबंधातून संशय बळावल्याने त्याच्या मानेवर सपासप वार करीत त्याची हत्या करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे शिवाजीनगर परिसरात दहशतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांच्या अंतरा नंतर पुन्हा एकदा जळगाव शहरात गुन्हेगारी ने डोके वर काढले आहे. सातत्याने होणाऱ्या गंभीर गुन्ह्याच्या घटना पोलिसांसमोर आव्हानात्मक परिस्थिती उभी करीत आहे. या सर्व परिस्थितीला तोंड देताना नागरिक मात्र भयावह परिस्थिती मध्ये आहे.
या घटनेसंदर्भात सविस्तर मिळालेली माहिती अशी की, शनिवारी शिवाजीनगर रोड भागात सज्जनगड या दुमजली इमारतीत दुपारच्या सुमारास तीस वर्षीय नरेश आनंदा सोनवणे (वय – 28) ,रा राजाराम नगर , दूध फेडरेशन, शिवाजी नगर,जळगाव या युवकाच्या हत्येची घटना घडली आहे. स्थानिकांकडून मिळालेली माहिती अशी की दुध फेडरेशन परिसरातील राजाराम नगरातील नरेश सोनवणे आपल्या कुटुंबियांचा वास्तव्यास असून तो रिक्षा चालवून कुटुंबांचा उदरनिर्वाह करतो शनिवारी 26 मार्च रोजी दुपारी तो शिवाजीनगर रात राहणाऱ्या आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता यादरम्यान दोघे एका खोलीत बसलेले असताना त्याठिकाणी विवाहित प्रियसीला दुसरा प्रियकर आकाश सखाराम सोनवणे हात तिथे आला, आकाशने दोघांना सोबत बसलेले पाहून त्याला धक्काच बसला, आपल्या प्रेयसीला नरेशच्या मिठीत बघताच त्याचा संताप अनावर झाला, या कारणावरून दोघांमध्ये प्रचंड वाद झाले या वादातून आकाशने धारदार शस्त्राने नरेशचा निर्घृण खून केला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नरेशच्या पाठीवर पोटावर व मांडीवर धारदार शस्त्राने गंभीर वार करण्यात आले आहेत. त्यामुळे नरेश जागीच ठार झाला, नरेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना आकाश व त्याच्या प्रेयसीने घटनास्थळावरून पळ काढल्याचे सांगितले जात आहे. तसेच शहर पोलिसांनी संशयित आरोपी आकाश याला ताब्यात घेतले असून कसून चौकशी करीत आहे.
यासंदर्भातील घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंता शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ठाकुरवाडी यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आढळले आहे जळगाव जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय शवविच्छेदन करण्यात आले, संशयित गुन्हेगारांच्या तपासासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. या घटनेमध्ये चॉपर चा वापर करण्यात आला असून मानेवर गंभीर वार करण्यात आले आहे.
समतानगर भागात नुकतच हत्या झालेल्या त्याच्या घराजवळ त्याचा निर्घुण खून करण्यात आला. हे प्रकरण देखील संशय आतूनच घडल्याचे सांगितले जात आहे. शहरात लागोपाठ खून झाल्याने पोलिसांसमोर गुन्हेगारांनी आव्हानात्मक परिस्थिती उभी केली आहे. शुल्लक कारणांवरून होणाऱ्या घटना यामध्ये थेट जीवावर बेतणाऱ्या ठरत आहे. पोलिसांचा गोपीनिय विभागावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. अनेक घटना घडण्याच्या आगोदर गोपीनिय विभाग महत्वाची भूमिका बजावतो मात्र समान्यांमधील जनसंपर्क व सूत्रांचा श्रोत याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.