मुंबई राजमुद्रा दर्पण | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. आयोगामार्फत दिनांक 23 जानेवारी 2020 रोजी घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 चा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. या पूर्वपरीक्षेत मुख्य परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची कट ऑफ आयोगाच्या https ://mpsc. gov. in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटींच्या अधीन राहून पूर्वपरीक्षेचा निकाल आधारे मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना 31 मार्च 2022 ते 14 एप्रिल 2022 या कालावधीत अर्ज करावा लागणार आहे. पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस कळविण्यात येणार आहे.
या परीक्षा अंतर्गत उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, सहकार राज्यकर आयुक्त, गटविकास अधिकारी, सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट – अ, उद्योग उपसंचालक, सहाय्यक कामगार आयुक्त, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी,, सहाय्यक गटविकास अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था उपाधिक्षक भुमी अभिलेख, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सहकारी कामगार अधिकारी मुख्य अधिकारी गट – ब, मुख्य अधिकारी गट – ब , उपनिबंधक सहकारी संस्था गट – अ या पदासाठी परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या निकाल आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 7, 8 आणि 9 मे रोजी अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे या जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. प्रस्तुत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मधून 405 पदे भरली जाणार आहे.