मुंबई राजमुद्रा दर्पण | बँकिंग क्षेत्रामध्ये गेल्या अनेक दिवसापासून आपण जर नोकरीसाठी प्रयत्न करीत असाल तर आपल्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. बेटिंग क्षेत्रांमध्ये ज्यांना आपले करियर बनवायचे असेल त्यांना सुवर्णसंधी चालून आली आहे बँक ऑफ बडोदा मध्ये पदवीधर तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे यामध्ये ब्रांच रिसीवेबल मॅनेजर या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रासह गोव्यात या पदांसाठी भरती चे नियोजन केले जात आहे. एकूण 159 पदांवर ही भरती केली जाणार असून या भरती प्रक्रियेदरम्यान महाराष्ट्र, गोव्यासह उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि बिहार मध्ये ही भरती केली जाणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी 14 एप्रिलपर्यंत या पदासाठी अर्ज करायचे आहे. कोणत्याही विद्यापीठातून पदवीधर असणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात असे देखील कळविण्यात आले आहे. सोबत बँकेत किंवा वित्तीय संस्थांमध्ये किंवा संबंधित कार्यालयात काम केलेल्या व्यक्ती ही या पदासाठी अर्ज करू शकतात वित्तीय संस्थेत दोन वर्ष काम केल्याचा अनुभव या पदासाठी गरजेचा असून वय वर्षे ते 20 ते 35 वय असलेल्यांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे.