मुंबई राजमुद्रा दर्पण | सध्या सायबर तसेच ऑनलाईन च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नागरिकांना फसवण्याचे प्रकार उघडकीस येत आहे. यामध्ये अनेकांना लाखोंचा गंडा लावण्यासाठी अनेक मोरके सक्रिय असून यापासून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. यामध्ये ऑनलाइन विक्री करणाऱ्या कंपन्यांनी उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविणे नंतर त्यांच्याकडून त्या संबंधित रेटिंग येणे किंवा रिव्यु मागणे सुरू केले आहे. अनेक जण रेटिंग देतात तसेच रिव्यु देखील येतात परंतु आता ऑनलाईन विक्री कंपन्यांकडून त्यांच्या त्याचे प्रतिसाद नसल्याने उत्पादने किंवा विक्रीसाठी प्रतिस्पर्धी कंपन्यांचे सर्वाधिक होणाऱ्या वस्तू ची विक्री करण्यासाठी रिव्यु रेटींगचा वापर होण्याची दाट शक्यता आहे. उत्पादन किंवा सेवेबाबत रेटिंग किंवा आता सायबर सुपारी चे नवे अश्र ठरण्याची शक्यता आहे. नव्याने शक्कल लढवण्यात येत आहे. यासाठी वेगवेगळ्या ऑनलाइन कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया लढवण्यात येत आहे. एखाद्या ग्राहकाने ऑनलाइन खरेदी केल्यानंतर त्याला तात्काळ लिंक पाठवून वस्तू चे रेटिंग किंवा रिव्हू मागण्यात येत आहे.
यामध्ये असे देखील निदर्शनास आले आहे की, अनेक जण रेटिंग देऊन मोकळे होतात, परंतु या त्रुटींचा फायदा या कंपन्यांना होत आहे. नेमके लाभाचे हे सूत्र धरून आता विविध ऑनलाईन कंपन्या तसेच सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांना जाळ्यात ओढण्यासाठी ह्या क्रिटिंग रिव्युचा चा वापर होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. एखाद्या कंपनीची विक्री पाडण्यासाठी किंवा स्वतःच्या कंपनीच्या उत्पादनांची विक्री वाढवण्यासाठी याचा वापर सध्या होत असल्याचे देखील निदर्शनास आले आहे. यामध्ये दोन्ही प्रक्रियेत ग्राहकांचे नुकसानच नव्हे तर फसवणूक देखील होण्याची शक्यता तज्ञा कडून वर्तवण्यात आली आहे.
अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध कंपन्या अनेक ऑफर्स देत असतात तसेच अधिक पैसे कमावण्याची लालूच देखील देतात मात्र या सर्व ऑफर्स ला अनेक जण बळी जात असल्याचे समोर येत आहे. घर बसल्या काम करून एवढे पैसे कमवा पार्ट टाइम पैसे कमवा असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येतात या कामांमध्ये बऱ्याचदा व फेक कस्टमर रेटिंग देण्याची जबाबदारी संबंधितांवर देण्यात येते हेच एक गरीब व रेटिंग ही तर ग्राहकांनाही फारवर्ड केली जाते. या मध्ये एखाद्या उत्पादनासाठी सकारात्मक व नकारात्मक देखील वापर केला जाऊ शकतो. यामुळेच सर्व सामान्य नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते.