जळगाव राजमुद्रा दर्पण | आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे गेल्या 22 मार्च तर आज गायत नऊ वेळा पेट्रोल आणि डिझेल चे भाव वाढ करण्यात आले आहे. जळगाव मध्ये डिझेल 100.34 पैसे तर पेट्रोल 117.62 रुपये इतके महाग झाले आहे.
दिलेल्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे प्रत्येकी 80 पैशाची दर वाढ झाली आहे. बुधवारी देखील इंधनाच्या दरात लिटरमागे ऐंशी पैशांची वाढ करण्यात आली होती नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 101.81 रुपयांवर पोहचले आहे. तर डिझेल 93.7 प्रति लिटर झाले आहे. तर मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर 116.72 रुपयांवर महागले आहे. तर डिझेल चा दर 100.94 रुपये झाला आहे. हप्त्या भरात पेट्रोल च्या दरामध्ये 6.84 रुपयांनी वाढ झाली आहे.
पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 84 पैशाची वाढ तर डिझेलच्या दरात देखील 84 पैशांची वाढ करण्यात आली आहे. रोज वाढ होत असलेल्या भाव वाढमध्ये मोठ्या प्रमाणात फटका सर्व सामान्यांना बसत आहे. नव्या दरानुसार राजधानी मुंबई मध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर 116.72 रुपये तर डिझेल 100.94 रुपये पोहोचले आहे. तर औरंगाबाद मध्ये पेट्रोल 116.72 तर डिझेल 99.1 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 115 रुपये 71 रुपये तर डिझेल 98.47 रुपये लिटर इतके झाले आहे. तर पुण्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलिटर अनुक्रमे 115.37 आणि 98.1 बारा रुपये आहे. तर उपराजधानीत नागपूर मध्ये पेट्रोल 115. 80 रुपये प्रति लिटर तर डिझेल 98.8 37 रुपये आहे.