मुंबई राजमुद्रा दर्पण | राज्यातील जनतेला राज्य सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे, गुढीपाडव्या पासून सर्व निर्बंध शिथिल करण्यात येणार आहे. कोरोनाचे सर्व निर्बंध हटविण्याचे आदेश देण्यात आले आहे. माक्स लावणे देखील ऐच्छिक करण्यात आले आहे. विदेशातील अमेरिका, इंग्लड या देशांनी नागरिकांना मास्क मुक्त केले आहे, पण आपण मास्क ऐच्छिक ठेवलेला असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. विविध उत्सव शोभायात्रा आपल्याला साजऱ्या करता येतील. डॉ. बाबासाहेबांची जयंती आपण उत्साहात साजरी करु शकतो हा जो काही सातत्याने प्रश्न विचारला जायचा, त्या प्रश्नाला या निर्णयातून घोषणा केली आहे, असेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला दिलासा देत माहिती दिली आहे.
मुंबई मधील लोकल नागरिकांसाठी मोठी जीवनवाहिनी असून यामध्ये प्रवास करणार्या नागरिकांना देखील दिलासा देण्यात आलेला आहे. दोन डोस झाले नसले तरी मुंबई लोकलमध्ये प्रवाशांना प्रवास करता येणार आहे एक डोस जरी झालेला असला तरी लोकलमध्ये प्रवास करता येणे आता शक्य आहे. कोरोना काळामध्ये फक्त सरकारी कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या सेवाभावी यांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती, मात्र आता सर्वच स्तरातील नागरिकांना लोकलचा प्रवास करता येणार आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
मास्क लावणे जरी ऐच्छिक असले तरी सर्वांनी खबरदारी म्हणून मास्क लावावा, गर्दीच्या ठिकाणी अजूनही आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊन काही नियम पाळले पाहिजेत. गेल्या दोन वर्षापासून आपण निर्बंधात आहोत, मात्र आता नागरिकांना मुक्त संचार करता येणार असल्याचे मंत्री टोपे यांनी सांगितले आहे.