बोदवड राजमुद्रा दर्पण | येथील तहसीलदारांसह तलाठी आठ हजाराची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे एसबी कडून दोघांना अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे. गेल्या अनेक दिवसापासून नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात एसीबी कडे तक्रारी येत होत्या मात्र यासंदर्भात अधिक पुरावा हाती लागत नसल्याने नेमकी कारवाई काय करावी हा मोठा प्रश्न होता मात्र अनेक प्रयत्नांची पराकाष्टा करीत अखेर रंगेहात लाच घेताना तहसीलदारांसह तलाठी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
बोदवड येथील तहसीलदार योगेश टोणपे यांच्यासह त्यांचा वाहनचालक व तलाठी व एका खासगी पंटराचा चा आरोपींमध्ये समावेश असून पुढील कारवाई एसबी करीत आहे. दरम्यान हे प्रकरण वाळू व्यवसायाच्या संबंधित असून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाकडून पैशांची अधिक मागणी केल्यावरून हा कायदेशीर सापडा रचण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
तहसील कार्यालयाचे तहसीलदार टोनपे लाच प्रकरणात अडकल्याने संपूर्ण महसूल प्रशासन हादरले आहे. यापूर्वी देखील जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात प्रांतअधिकारी दीपमाला चौरे यांच्यावर अशाच पद्धतीने सापडा रचून त्यांच्यावर लाचेचा ठपका ठेवत एसबी कडून कारवाई करण्यात आली होती. आणि पुन्हा एकदा आता बोदवड तहसीलदारां वर एसीबी च्या झालेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे.