जळगाव राजमुद्रा दर्पण | राष्ट्रवादी काँगेस पार्टी जळगांव महानगर तर्फेजळगाव शहरातील नवी पेठ, मेहरून, परिसरात अमृत योजनेच्या खोदकामा बद्दल व पुन्हा नव्याने काँक्रिट रस्त्याच्या होत असलेल्या कामाबद्दल तसेच शिवाजी नगर पुल ठेकेदाराकडून कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे सामान्य जनतेस होत असलेल्या त्रासाबद्दल मनपा प्रशासनाला कोणतेही गांभीर्य नसल्याबद्दल जिल्हाधिकारी यांच्याकडे राष्ट्रवादी महानगर च्या वतीने निवेदन देऊन तक्रार करण्यात आली आज.
शहरात होत असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे गुणवत्तेबाबत त्रीसंसदीय समिति कडून तपासणी करण्यात यावी या बाबत निवेदन देण्यात आले आहे. महानगर जिल्हाध्यक्ष अशोकभाऊ लाडवंजारी , युवक शहराध्यक्ष रीकु चौधरी , सौ. जयश्री ताई पाटील , जितेंद्र बागरे, राजु मोरे, सुशिल शिंदे, नईम खाटीक , भगवान सोनवणे, सुर्यकांत भामरे, संजय जाधव, किरण चव्हाण , संजय हरणे , यादी उपस्थित होते.