जळगाव, राजमुद्रा दर्पण : एकाच वेळी ५ रंगमंच…तब्बल २७ कलाप्रकारांचे सादरीकरण…सलग ५ दिवस चालणारा महोत्सव आणि महाविद्यालयीन तरुणाईचा अमर्यादित जल्लोष असणारा युवारंग महोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आयोजक महाविद्यालय आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे तयारीला वेग आला असून, तरुणाई देखील आपआपल्या कलाप्रकाराच्या उत्तम सादरीकरणासाठी तालमींवर भर देत आहे. नुकतीच विद्यापीठाच्या कुलगुरूंनी युवारंगची घोषणा केल्याने शहरातील जी. एच. रायसोनी महाविद्यालयांतील तरुणांना आता केवळ ‘युवारंग’ हे एकच ध्येय दिसत आहे. शहादा येथील पूज्य साने गुरुजी महाविद्यालयात हा महोत्सव १८ ते २१ एप्रिल दरम्यान होणार आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिक्षेत्रातील जवळपास ११० महाविद्यालयांमधील अडीच ते तीन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. तगडी स्पर्धा आणि युवारंगच्या सर्वसाधारण विजेतेपदाचे चॅलेंज असे वातावरण युवारंग महोत्सवात असते. यामुळे प्रतिस्पर्ध्याच्या तोडीस तोड आपले सादरीकरण करून जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचा संघ जिंकण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
तालमींना वेग
यंदा युवारंगची तारीख जाहीर होताच रायसोनी महाविद्यालयातील कलाकारांनी तयारीला सुरुवात केली आहे. महाविद्यालयातील तरुणाई जिंकण्याच्या उमेदीने नृत्य, नाट्य, संगीत, ललितकला, साहित्यकला यांच्या तालमींवर भर देत आहे. प्रतिस्पर्धी महाविद्यालयाचे कोणते नृत्य, नाट्य असेल याचाही वेध हे युवक घेत असून, त्यादृष्टीने सादरीकरणात जीव ओतण्याचा प्रयत्न करीत आहे.
प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल – संचालक, रायसोनी इस्टीट्यूट जळगाव
आमच्या महाविद्यालयांमध्ये या महोत्सवाच्या तालमींना वेग आला आहे. ऐनवेळी प्रवेश नोंदवायला अडचण नको, म्हणून अनेक विध्यार्थी शक्य तितक्या लवकर नोंदणी करत आहेत. व आपापल्या कलाप्रकाराचा जीव ओतून सराव करीत आहे, महाविध्याल्याकडूनही सर्व कलावंत विध्यार्थ्यांना सर्वोतपरी मदत करण्यात येत आहे. तसेच यासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी परीश्रम घेत आहेत.