जळगाव राजमुद्रा दर्पण | १४ एप्रिल बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रात्री उशिरा पर्यंत पोलीस दलाची ड्युटी लागलेली असताना, परत सकाळी महाराष्ट्राचे नेते मंडळी आली असता पुन्हा सकाळी उठून बंदोबस्त लागला, यात कुठलीच खाण्यापिण्याची व्यवस्था नाही असे समजले असता भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव महानगर तर्फे बंदोबस्तात असलेल्या पोलीस बांधवांना पाणी वाटप करण्यात आले. माणुसकीचे दर्शन देत भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांची जाण ठेवत लक्ष सामाजिक उपक्रम राबवला आहे.
जळगाव शहरामध्ये सध्या 43, 44 अंश एवढे तापमान असून सर्वाधिक शरीरासाठी पाण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणात उष्णता च्या लाटा असून पाण्याची सर्वाधिक गरज असते. आणि अशा वातावरणामध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस बांधवांना आहे त्या परिस्थितीत युवा मोर्चाच्या वतीने पाण्याच्या बॉटल उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यावेळी या उपक्रमात युवा मोर्चाचे सरचिटणीस मिलिंद चौधरी, उपाध्यक्ष विक्की सोनार, राहुल मिस्तरी, चिटणीस रोहित सोनवणे, सदस्य भूषण भोळे, राहुल पाटील,दिनेश मराठे,मयूर चौधरी,कल्पेश कासार उपस्थित होते..