आक्षेपार्ह व्हाट्सअप स्टेटसवरून वाद ; शिरसोलीत दोन गटात दगडफेक
शिरसोली राजमुद्रा दर्पण – आक्षेपार्ह व्हाट्सअप स्टेटसवरून वाद उमळल्या नंतर शिरसोलीत रात्री १०:३० ते ११ वाजेच्या सुमारास समाज कंटकांनी दोन गटात दगडफेक केली. या मुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. या दगडफैकीत दोन वाहनांच्या काचा फुटल्या असून तर एक तरुण जखमी झाला आहे .एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे. सध्या तणाव पूर्ण शांतता असून पोलिसांनाचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.
सविस्तर प्रकरण असे की, दोन गटात दगडफेक करण्यात आल्याने रहीस युसुफ मणियार यांच्या मालकीची एम.एच.19 सी.वाय. 2799 आयशर ट्रक व डॉ. सुफीयान शाहा यांच्या मालकीची एम.एच. 03 ए.आर.1508 फोरव्हिलर सेंट्रोकारचे काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर अहमद अखिल पिंजारी (वय – 18) हा तरुण रस्त्याने मलीक नगर मध्ये जात असताना डोक्याला दगड लागल्याने जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
या वादात सोशल मीडियावरून आधी आक्षेपार्ह व्हाट्सअप स्टेटस ठेवणा-या तरुणांला मराठी शाळेच्या मोकळ्या मैदानात काही तरुणांनी मारहाण केली, यामध्ये काही तरुणांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला नंतर अफवा पसरवून मलीकनगर व नसीमन काँलणी मध्ये काही समाज कंटकांनी दगडफेक केली. मात्र शिरसोली गावात हनुमान जंयती निमित्त पोलीस बंदोबस्त असल्याने एमआयडीसी पोलीस लागलीच घटनास्थळी पोहोचले यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
घटनास्थळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे व.त्यांचे सहकारी पोहचले असून परिस्थिती नियंत्रणात आहे .दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास व गुन्हा दाखल करण्याचे काम एमआयडीसी पोलीस करीत आहे. कोणत्याही अफवाना बळी पडू नये असे आवाहन ग्रामस्थांन सह जिल्ह्या भरात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी केले आहे.