जामनेर राजमुद्रा दर्पण :- विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजप, काँग्रेस , प्रहार युतीचे सहकार पॅनल तर संजय गरुड यांचे नेतृत्वातील राष्ट्रवादी,सेनेचे शेतकरी पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. सहकार पॅनलच्या एस.सी व ओबीसी मतदार संघातील जागा बिनविरोध, महिला ,व भटक्या विमुक्त जागेसाठी एकास एक अशी लढत होती तर, सर्वसाधारणच्या ८ जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात होते. मागील तीन पंचवार्षिक पासून बिनविरोध झाली होती.१३ जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत अनुसूचित जाती व इतर मागास प्रवर्गातील अशा दोन जागा माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या सहकार पॅनलच्या बिनविरोध झाल्या होत्या महिला प्रवर्ग तसेच भटक्या जाती जमाती प्रवर्गातील मतदार संघात एकास एक लढत झाली सर्वसाधारण आठ जागेसाठी १५ उमेदवार रिंगणात होते.
दिनांक १७ रोजी वाकी रोडवरील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा १ येथे मतदान सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत एकुण मतदार १००५ पैकी ५९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला चार वाजेनंतर मतदान केंद्रावरच मतमोजणी होऊन निवडणूक निर्णय अधिकारी डी व्हीं पाटील यांनी निर्णय घोषित केला यात विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे १) शंकर शिवलाल राजपूत ३३२(२) विजय दामोदर सोनवणे ३१०( ३) प्रदिप अमृत गायके ३२२(४) राजेंद्र रघुनाथ भोईटे ३२६(५) ज्ञानेश्वर केशव माळी ३०८(६) देवराम झांगो चौधरी ३१४(७) पांडुरंग केशव महाजन३२०( ८) अ जावेद अ वाहेद ३३२ महीला प्रवर्ग १) स्नेहकांता जगन्नाथ लोखंडे,३२८( 2) माधुरी दिनेश लखोटे, ३४० भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग १) गोविंदा विष्णू धनगर ३४२ अनुसूचित जाती प्रवर्ग. जगन्नाथ शंकर सुरडकर. (बिनविरोध ) इतर मागास प्रवर्ग.. गोपाल लक्ष्मण पाटील(बिनविरोध) हे विजयी उमेदवार असून राष्ट्रवादी शिवसेना शेतकरी पँनलचे पराभूत उमेदवार उमेदवार व त्यांना मिळालेली मते खालील प्रमाणे सर्वसाधारण प्रवर्ग १) रमेश भाऊराव पाटिल २०९(२) राजपूत हीमत भारत २०९( ३) सोनवणे पांडुरंग शामराव १९८(४) बोरसे कविता प्रल्हाद २१८( ५) महाजन प्रवीण वसंत १९७( ६) सुधाकर दौलत सोनार २००( ७) प्रमोद जगन्नाथ टहाकळे २१५ महिला प्रवर्ग १) लिलाबाई विश्वनाथ महाजन १९४ (2) अख्तर बी उस्मान १८५ भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग १) सुनिल नामदेव धनगर २०९ अशा सहकार पॅनलच्या १३ पैकी १३ जागांवरील उमेदवार निवडून आले आहेत माजी मंत्री आ.आमदार गिरीष महाजन यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.